डोंबिवली पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह दोघा लाचखोरांना अटक

प्रथमेश ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात अडकविण्यासाठी दिली होती धमकी

डोंबिवली दि.०८ – डोंबिवलीतील गाजत असलेल्या प्रथमेश ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन एका सोनाराकडे दहा लाखाची लाच मागणाऱ्या डोंबिवली पोलीस ठाण्याचा अधिकारी आणि त्याचे दोन साथीदार अश्या तिघांना एक लाखाची लाच घेताना रंगेहात अटक केल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. ही कारवाई ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी संध्याकाळी केली. अटक केलेला लाचखोर सुनील भाऊराव वाघ ( ३४ ) हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. तर महेश रतन पाटील ( ३६ ) आणि प्रकाश रामलाल दर्जी ( ३६ ) अशी या पोलीस अधिकाऱ्याच्या साथीदारांची नावे आहेत.यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर गेली १५ वर्षापासून असलेले प्रथमेश ज्वेलर्सने सोन्याचे दागिने ठेवी स्वरुपात घेणे सुरु केले. १० तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवा, १ वर्षानंतर १२ तोळे सोन्याचे दागिने परत करू असे अजित याने नागरिकांना सांगितल्यावर अनेक नागरिकांनी या आमिषाला भुलून सोन्याचे दागिने ज्वेलर्समध्ये ठेवले.

हेही वाचा :- कल्याण ; बेकायदेशीर रित्या गाय बैलची वाहतूकीच्या संशयावरून ट्रक मालकासह चालक क्लिनरला बेदम मारहाण

दिवाळी जवळ आल्याने दागिने हवे असल्याने ज्यांनी दागिने ठेवले या ज्वेलर्स मध्ये ठेवले होते त्यांनी परत घेण्यासाठी गेले असता सदर ज्वेलर्सचे मालक अजित आपले दागिने घेऊन पसार झाल्याचे त्यांना समजले. अजित गेल्या तीन महिन्यापासून आपले दुकान बंद करून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने बदलापूर, वांगणी आणि डोंबिवली येथील रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केल्याचा तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे दुबईला कोणाकडे गुंतवणूक केली याचा शोध सुरु आहे. जनतेचे पैसे परत मिळावे म्हणून पोलीसांचे प्रयत्न सुरु आहे. प्रथमेश ज्वेलर्स व मालक यांच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात भा.दं.वि.४२० आणि ४०६ कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच तपास पोलीस सखोल पातळींवर करत असतानाच एका सोनाराचे नावही पुढे आले. याप्रकरणी सपोनि सुनील वाघ याने या सोनाराची चौकशी सुरु केली.

हेही वाचा :- दोन महिन्यापासून बंद असलेले डोंबिवलीतील सावित्रिबाई फुले नाटयगृह तातडीने सुरु करा

प्रथमेश ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात अडकविण्याची वाघ याने या सोनाराला धमकी दिली. गोल्ड ज्वेलरी मेकिंगचे पेपर, गुमास्ता लायसन्स आणि गाळ्याचा करारनामा कोठारीला परत करण्यासाठी या अधिकाऱ्याने गुन्ह्यात अडकविण्यासाठी धमकी देत दबावतंत्र सुरु केले. त्यासाठी या अधिकाऱ्याचा साथीदार महेश पाटील याच्या मार्फत सोनाराकडे १० लाखाची रुपयांची मागणी केली. त्यामुळे भयभीत झालेल्या सोनाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.या प्रकरणाची पडताळणी केली असता लाचखोरांनी पैशाची मागणी केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा लावला. यावेळी सपोनि सुनील वाघ याच्या वतीने प्रकाश दर्जी आणि महेश पाटील या दोघांना लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयाची रोकड घेताना अटक केली.कल्याण कोर्टात हजर केले असता अधिक चौकशीसाठी या तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email