सामाजिक

विवेकानंद सेवा मंडळातर्फे शहराच्या विविध भागात अडीचशे झाडे लावण्यात येणार – पहिल्या टप्प्यात १७५ झाडे लावली

डोंबिवली, दि. ४
विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवलीतर्फे शहराच्या विविध भागात अडीचशे झाडे (रोपे) लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी ठाकुर्ली येथील रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या बारावी वहिनी येथे १७५ रोपे लावण्यात आली.

रेल्वेच्या विशेष सुरक्षा दलाचे अधिकारी शकील खान, डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर, श्री लक्ष्मीनारायण संस्थेचे संस्थापक माधव जोशी, श्री गणेशमंदिर संस्थानचे सचिव प्रवीण दुधे, विवेकानंद सेवा मंडळाचे अनिल मोकल, चिऊ पार्कचे डॉ. प्रल्हाद देशपांडे, दीपक काळे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. श्रेया भानप,, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी, निसर्गप्रेमी डोंबिवलीकर आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान उपस्थितीत होते.

ग्रेन अँड प्रोव्हिजन मर्चंट असोसिएशन, मधुमालती एंटरप्राईजेस आणि दिपक काळे यांनी आर्थिक सहकार्य केले. रोटरी क्लब आँफ डोंबिवली पश्चिमतर्फे चिऊ पार्कतर्फे काही झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *