शेलार नाक्याजवळ रिक्षाचालकांच्या दोन गटात मारहाण

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.३० – रिक्षाचालकांच्या दोन गटात मारहाणीचा प्रकार रात्री डोंबिवलीत घडला आहे. मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचं नांव बाबासाहेब कांबळे असून तो डोंबिवली पूर्वेच्या शेलार नाका परिसरात राहतो. शनिवारी रात्री त्याला काही जणांनी जानकी हॉटेल परिसरातून रिक्षात उचलून नेवून मारहाण करण्यात आली. बाबासाहेब हा रक्तबंबाळ अवस्थेत शेलार नाक्यावर पडलेला होता.

हेही वाचा :- कोपर जवळ आणखी एका तरुणांचा अपघाती मृत्यू

अशी माहिती त्याचा भाऊ सिद्धार्थ याने सांगितले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मारहाण करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email