दोघा भावांचे अपहरण करून दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी…
डोंबिवली दि.१८ – दोन लाख रुपयांसाठी चौकडीने दोन भावांचे अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करत गोळी झाडल्याची केल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी तानाजी काठे,विनय अय्यर,संजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली पूर्व दत्त नगर लेवा भवन एकता बिल्डिंग मध्ये राहणारे मंगेश शेलार हा शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या खाली उभा असताना तानाजी काठे हा त्या ठिकाणी गाडी घेऊन आला गाडीमध्ये विनय अय्यर व संजय हे बसले होते.
या तिघाणी मंगेशला जबदरस्तीने गाडीत बसवुन खंबाळपाडा येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर नेऊन `मला दोन लाख रुपये दे नाही तर तुला मुरबाडच्या फार्म हाऊसवर नेऊन गोळ्या घालेन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मंगेश यांनी आपला मावस भाऊ सोमनाथ देवकर याला त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर तानाजी काठे सह इतर तिघांनी लाकडी दांडक्याने या दोघांना बेदम मारहाण करत सोमनाथच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली. त्यानंतर या तिघांनी त्यांच्या एक साथीदारासह सोमनाथ व मंगेशला एका पुन्हा एका गाडीत बसवून मुरबाड सरळगाव येथील एका फार्म हाऊस वर घेऊन गेले. त्या ठिकाणी दोन लाखांची मागणी करत पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच सोमनाथ याला स्विमिंग पूल मध्ये बुडवले. घाबरलेल्या या दोघांनी पैसे देण्याचे कबूल केले. मात्र त्यानंतर ही तानाजी काठे याने सोमनाथच्या दिशेने गोळी झाडली. या दोघांनी कशी बशी आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी मंगेश शेलार यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी तानाजी काठे, विनय अय्यर, संजय यांच्यासह एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: