ट्विटरकडून भारतातील मोजक्या लोकांना ‘ट्विट एडिट’ पर्याय उपलब्ध

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.३० :- ट्विटरने भारतात ‘एडिट ट्विट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्थात भारतातील ‘व्हेरिफाईड युजर्स’नाच ट्विटरचे हे एडिट फिचर वापरता येणार आहे. ‘पेटीएम’चे विजय शेखर शर्मा यांनी त्यांचे स्वतःचे एक ट्विट दुरुस्त करून ही माहिती दिली. ट्विटर कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क यांनी कंपनीची सूत्रे हाती घेताच ट्विटरमध्ये हा मोठा बदल करण्यात आला असून ट्विटरवर एडिटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा :- मुंबईसह राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी! – राज्यात थंडीचे आगमन

ट्विटरच्या या नव्या फिचरमुळे आता ट्वीट केलेल्या मजकुरात दुरुस्ती करता येणार आहे. या नवीन फीचरमध्ये ट्वीटच्या शेजारी असलेल्या तीन टिंबांवर क्लिक केल्यानंतर ‘एडिट ट्वीट’ असा पर्याय दिसणार आहे. सध्या तरी काही मोजक्या लोकांना हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी लवकरच तो सर्वसामान्य लोकांनांही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.‌

Leave a Reply

Your email address will not be published.