मैत्रिणीला फोन करतो म्हणून त्रिकुटाने तरुणाला बेदम मारहाण
डोंबिवली दि.०९ – कल्याण पश्चिम खडकपाडा परिसारत भाग्यश्री इमारती मध्ये राहणारे उमेश सूर्यवंशी हे काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास खडकपाडा परीसरातील बँकेच्यामागील बाजूस असलेल्या शाळेच्या मागून घरी जात असताना विकी भोईर ,राजेश भोईर ,कैलास भोईर या तिघांनी त्याला हटकले.
हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी आणण्याची पक्षीमित्रांची मागणी…
राजेश ने त्याला तू माझ्या मैत्रिणीला फोन का करुण त्रास का देतो असे विचारत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी उमेश याने महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विकी भोईर ,राजेश भोईर ,कैलास भोईर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: