२६/११ च्या हल्ल्यातील जवानांना डोंबिवलीत ईगल ब्रिगेड फाउंडेशनची श्रद्धांजली
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२६ – २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्ष झाली. २६/११ च्या पूर्वसंध्येला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात प्राणांची आहुती दिलेल्या पोलिस जवानांसाठी, पोलिस बांधवांसाठी, पोलिस अधिकाऱ्यांसाठी ईगल ब्रिगेड फाउंडेशनने डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानात श्रद्धांजली वाहण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात आले की, पोलीस ऊन-वारा-पाऊस कसलीही तमा न बाळगता देशाची सेवा करतात, संरक्षण करतात.
हेही वाचा :- हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे 20 ट्रेकर्स अडकले
नागरिकांवर संकट आले कि वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देतात. अश्या शहीद पोलीसांचे नेहमी स्मरण केले पाहिजे. तसेच जे पोलिस बांधव स्वतःचे घर-सण-वार सोडून आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहेत त्यांना मान दिला पाहिजे, असेही यावेळी ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले. यावेळी योगेश साबळे, संजय गायकवाड, मंदार लेले, ज्योती वारुडे, सचिन वारुडे, ओजस ठोंबरे व इतर सदस्य उपस्थित होते.