पर्यटन मंत्रालयाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

नवी दिल्ली, दि.२१ – पर्यटन मंत्रालयाने आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. आज सकाळी साडेसहा ते साडेआठ दरम्यान कुतुबमिनार परिसरात योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक मिनाक्षी शर्मा यांनी या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. या कार्यक्रमात ३० हून अधिक परदेशी पाहुण्यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.

ताज महल, औरंगाबादच्या अजंठा लेणी, बोधगयातील कोणार्क मंदिर, कोणार्क मधील सूर्य मंदिर, गुजरातमधील सोमनाथ मंदिरासह देशभरात विविध पर्यटन स्थळी योगसत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email