युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं

( म. विजय )

इस्रोचा चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आहे. सॉफ्ट लँडिंग करण्यात विक्रमला अपयश आल्यानं इस्रोच्या चांद्रयान-2मोहिमेला काहीसा धक्का बसला. मात्र अवघ्या 35 तासांमध्ये इस्रोनं विक्रमचा ठावठिकाणा शोधून काढला. आतापर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये लँडरशी संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीला यानाशी संपर्क तुटला होता. या यानाची माहितीतब्बल 12 वर्षांनी समोर आली. त्यामुळेच विक्रम लँडरशी संपर्क साधला जाऊ शकतो, असा विश्वास इस्रोला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीनं (ईएसए) मंगळावर जाण्यासाठी एक मार्स एक्स्प्रेस मोहीम आखली होती. त्यासाठी 2 जून2003 रोजी एक यान अवकाशात झेपावलं. त्यात बीगल-2 लँडर होतं. जूनमध्ये झेपावलेलं यान 6 महिन्यानंतर म्हणजेच 19 डिसेंबर 2003 रोजी मंगळावर पोहोचणार होतं.

हेही वाचा :- 

हे यान त्याच दिवशी मंगळावर पोहोचलं. मात्र त्याचा संपर्क तुटला. ईएसएनं जवळपास दीड महिना बीगल-2शी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. अखेर फेब्रुवारी 2004मध्ये मार्स एक्स्प्रेस मोहीम अपयशी ठरल्याची घोषणा करण्यात आली. बीगल-2शी संपर्क साधण्यात अपयश आल्यानंतर मार्स ईएसएनं ऑर्बिटरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातही यश न मिळाल्यानं ईएसएला मंगळाचे फोटोदेखील मिळू शकले नाहीत. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी आहे का, याची माहिती ईएसएला समजली नाही. यानंतर जवळपास 12 वर्षांनी अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळ मोहीम आखली. नासाचं मार्स रिकॉन्सेंस ऑर्बिटर मंगळाच्या माहिती मिळवण्यासाठी त्याभोवती फिरत होतं. या ऑर्बिटरनं 16 जानेवारी 2015 रोजी बीगल-2चे फोटो पाठवले. दरम्यानच्या काळात ईएसएच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेचे प्रमुख कॉलिन पेलिंगरचा मृत्यू झाला होता.

भाजपा नगरसेविका सायली संजय विचारे द्वारा जनउपयोगी कार्यो का भूमिपूजन
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email