ऊर्जा वापराचं हे चित्र बदलण्यासाठी आपण १७५० च्या आधीच्या युगात जाण्याची गरज – जेष्ठ पर्यावरणतज्ञ दिलीप कुलकर्णी

अहवाल २०२२

पर्यावरण दक्षता मंडळाने साजरा केला २३ वा वर्धापन दिन

पर्यावरण दक्षता मंडळाचा २३ वा “वर्धापन दिन” दि. १० जुलै २०२२ रोजी स. १०:०० वाजता सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी, ठाणे (प.) येथे अनेक पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरनहितचिंतकाच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला.

आज आषाढी एकादशी आणि याचंच औचित्यसाधून पर्यावरणची दिंडीकाढून कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर खेळ मांडीयेला या गाण्यावर नृत्याविष्कार सौ. निवेदिता रानडे आणि टीम यांनी सादर केला.

यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिलीप कुलकर्णी (जेष्ठ पर्यावरणतज्ञ, लेखक आणि अभियंता )अशा सुविख्यात व्यक्तिमत्व व्याख्यान देण्याकरिता कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ठाणे जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री. शरद गांगल हे विशेष अतिथी म्हणून यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

कार्यक्रमांचे शुरुवात मान्यवरांच्या हस्ते चारोळी रोप लाऊन झाली. चारोळीचे शास्त्रीय नाव : Buchanania lanzen (बुचानानीया लाँझेन), हे झाड आंब्याच्या कुळातील असू न हि प्रजाती उष्ण व कोरड्या हवामानात उत्तम वाढते. जानेवारी ते मार्च महिन्यात हिरवट, पांढरी लहानसर फुले येतात. फळ धारणा एप्रिल ते मे महिन्यात होते. ह्या फळातील बिया गुळगुळीत काळपट असतात. हया बियाच चारोळ्या आहेत.

चारोळी मेंदू व शरीरास अत्यंत पोषक असतात. वेगवेगळ्या मेवा मिठाईची चव वाढविण्यासाठी चारोळी वापरतात. वृक्षाच्या साली मधून डिंक स्त्राव होतो, हा डिंक औषधी आहे. विदर्भ, खानदेश मधील वनात चारोळी वृक्ष मोठ्या प्रमाणत आढळतात असे कुलकर्णी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात डॉ. प्रसाद कर्णिक यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाची सविस्तर माहिती दिली. पर्यावरण या विषयाकडे आपण आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो परंतु पर्यावरण म्हणजे निसर्ग आणि जोपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात आपण जेव्हा जातो तेव्हाच निसर्गाचे म्हणजेच पर्यावरणाचे जातं करू शकतो असे डॉ. कर्णिक यांनी सांगितले.

त्यानंतर संगीता जोशी यांनी पर्यावरण शाळेच्या कार्याचा आढावा घेतला, त्यात गेल्या दोन वर्षात ऑनलाईन माध्यमातून जवळपास १०००० विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण शाळेच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण पोहोचले आहे असे सांगितले. नंदनवन, ग्रीन शॉपी, ग्रीन लिविंग कन्सल्टन्सी, निसर्गायण या संस्थेच्या प्रकल्पाची माहिती दिली.

संस्थेचा देवराई प्रकल्पाला या वर्षी सौ. वीणा गवाणकर, श्री. राजेश नार्वेकर आणि श्री. श्रीकांत शिंदे या मान्यवरांनी भेट दिली असे संगीता जोशी यांनी माहिती दिली. संस्थेने दोन यु ट्युब चॅनेल काढली आहेत एक आपलं पर्यावरण आणि पर्यावरण दक्षता मंडळ याना भेट द्या असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री. शरद गांगल यांनी आपल्या मनोगतात म्हणाले संस्थेने जी देणगी दिली आहे ती पर्यावरण शाळा. या शाळेतून हजारो विद्यार्थी तयार झाले आहेत आणि ते पर्यावरण जातानाचे काम करत आहेत.

छोट्या छोट्या उपक्रमातून संस्थेने जे काम सुरु केले आहे त्या कामांना ठाणेकरांनी प्रतिसाद देण्याची गरजेचे आहे जेणेकरून पर्यावरण संरक्षणासाठी बळकटी मिळेल.

यानंतर “ग्रीन लव्हर्स क्लब” या प्रकल्पाबद्दल डॉ. मानसी जोशी यांनी माहिती दिली. हा कोर्से २०१४ साली सुरु झाला आणि कालपासून ठाण्यात यावर्षीचा वर्ग सुरु करण्यात आला आहे. हा कोर्से मागील तीन वर्ष्यापासून डोंबिवली येथे हि घेण्यात येतो. त्यांना डॉ.जोशी यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या व्यक्तींना व्यासपीठावर बोलावून त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

“आपलं पर्यावरण” या संस्थेच्या मासिकाबद्दल गेल्या काही वर्षाचा आढावा डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी घेतला. या महिन्यातील आहवलाचा असून संस्थेने गेल्या वर्षी संस्थेने केलेल्या प्रकल्पाची माहिती त्यात मिळेल असे डॉ. काळे यांनी सांगितले.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. विद्याधर वालावलकर यांनी इन्विरो व्हिजिल च्या जैव वैदकीय कचरा व्यवस्थापन या युनिट ची माहिती दिली. जैव वैदकीय कचरा व्यवस्थापन हे युनिट पर्यावरण दक्षता मंडळाचा आधारस्तंभ होता परंतु एन्विरो व्हिजिल कडे आलेल्या आव्हानांना सामोरे कसे गेलो याबाबत भाष्य श्री. विद्याधर वालावलकर यांनी केलं.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दिलीप कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं कि पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे त्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपण ऊर्जेसाठी फक्त कोळश्यावर आवलंबून आहोत. खरंतर पर्यावरणीय समस्या या अधिक ऊर्जावापरमुळे होतात याचा समग्र विचार आपण केला पाहिजे. ऊर्जा संवर्धनासाठी शारीरिक ऊर्जा वापरणे हे आपण विसरूनच गेलो आहोत.

पूर्वी शरीर श्रमाने अनेक काम होत होती आणि त्यामुळे आपल्याला अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता भासत नव्हती. आता आपण उत्पादित उर्जेवर अवलंबून आहोत ते कमी करण्याची गरज आहे. कुठेतरी ऊर्जा वापराचं हे चित्र बदलण्यासाठी आपण १७५० च्या आधीच्या युगात जाण्याची गरज आहे.

आपली जीवनशैली हे सूर्यावर आधारित असली पाहिजे आणि हे आपण झाडाकडून शिकण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

 

 

यानांतर डॉ. विकास हाज़िरणीस (एन्विरो व्हिजिल चे अध्यक्ष) यांनी अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत मांडले. संस्थेसोबत तुम्ही मंडळी आजपर्यंत सोबत आहेत अशीच साथ आणि प्रेम यापुढे हि संस्थेवर राहील हि अशा व्यक्त केली.

पर्यावरण दक्षता मंडळ सर्वसामन्याच्या मनातील पर्यावरणीय संकल्पना दृढ करण्याचा पर्यंत करत असत. त्यासाठी जमिनीवर उभं राहून केलेलं काम कसं उपयोगी ठरले याचा प्रत्यय गेल्या २२ वर्ष्यात आला असे डॉ. विकास हाज़िरणीस यांनी सांगितलं. यानंतर आपलं पर्यावरण या मासिकाच्या कार्यकारी संपादिका सौ. कविता वालावलकर यांनी कार्यक्रमाचा समारोप भाषण केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.