टिटवाळा पोलिसांची हुक्का पार्लरवर धडक कारवाई
डोंबिवली दि.२२ – टिटवाळा पोलिसांनी गेल्या दोन दिवसात आंबिवली येथील द बॉलिवूड बीच ढाबा व कांबा येथील मयूर रेसिडेनसी येथील हुक्का पार्लर वर छापे टाकत कारवाई केली या धडक कारवाई मुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. नुकताच नव्याने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी गुन्हेगराच्या व अवैद्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. आंबिवली येथील बाळ कुष्ण पेपर मिल जवळील द बॉलिवूड बीच ढाबा येथे राजरोस पणे हुक्का पार्लर चालत हॊते.
हेही वाचा :- डोंबिवलीत घरफोडी
याची खबर मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धाड टाकत कारवाई करण्यात आली. त्या पाठोपाठ पुन्हा कांबा येथील मयूर रेसिडेनसी येथील हुक्का पार्लर वर कारवाई करण्यात आली. या कारवाईत द बॉलिवूड बीच ढाबा हुक्का पार्लर मालक असमत जवेर, कल्याण (30) व त्याचे कामगार तसेच मयुर रेसीडेन्सी कांबा येथील हुक्का पार्लर चे त्रिलोक पाटील, सुरज विश्वकर्मा, अमित सामरा, रवी मनमाने, राहुल पगारे, निरज गोस्वामी यांच्या विरोधात सिगारेट व अन्य तंबाखु जन्य उत्पादने कायदा 2003 कलम 4 (क), 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.डी. सावळे अधिक तपास करीत आहेत.