मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे वेळेची बचत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामाची पाहणी
मुंबई दि.११ :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. लोणावळा ते खोपोली एक्झिट असा १३.३ किलोमीटर चा हा प्रकल्प आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पातील दोन्ही बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे पुणे- मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सहा किलोमीटरअंतर कमी होणार आहे.
बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा ‘एमयसआरडीसी’ चा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे बोरघटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ते बांधले जाणार आहेत. लोणावळा पासून सुरू होणारा हा बोगदा खोपोली एक्झिट येथे संपणार आहे.