टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाचे शुक्रवारी उदघाटन

मुंबई आसपास प्रतिनिधी
डोंबिवली-: टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाचा उदघाटन समारंभ शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.‌

टिळकनगर विद्यामंदिराच्या पेंढरकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘आयसीटी’ मुंबईचे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र कुलकर्णी हे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.‌ मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.‌ अजय भामरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.‌

डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या घरातील दिवेबंद आणि घंटानाद आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published.