मंत्री ऐकत नसतील तर कांदे फेकून मारा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे
नाशिक दि.१९ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कळवणला आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आमचं ऐकत नसल्याची तक्रार राज यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या या समस्या जाणून घेतानाच मंत्री ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारण्याचा सल्लाही राज यांनी दिला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी राज यांनी शेतकऱ्यांना मुंबई भेटीचं आमंत्रणही दिलं. दरम्यान, राज यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिंडोरीतही त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून राज यांचं स्वागत केलं. राज यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
Please follow and like us: