कोर्टात आरोपींना बोगस जमीनदार देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन संशयिताना अटक

 

पैसे घेउन आरोपींना बोगस जामीन पुरवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ठाणे क्राईम ब्रांच यूनिट 4 उल्हासनगरने रंगेहाथ पकडले आहे. गुन्हे शाखा उल्हासनगर यूनिटला काही इसम आरोपींना कोर्टात बोगस जामिनदार देणार असल्याची गुप्त माहीती मिळाली, त्या प्रमाणे तारीख 3/07/2018 रोजी 12:10 च्या वेळेला तीन संशयित कल्याण कोर्टात आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या कडे विचारपूस केली असता त्यांनी बनावट रेशनिंग कार्ड, ग्रामपंचायत कर पावती तयार करून आरोपींना जामीन देण्यासाठी तयारी केल्याचे सांगीतले, तसेच त्यांनी सुमारे एक वर्षापासून जवळपास 125 ते 150 आरोपींना कल्याण , उल्हासनगर तसेच ठाणे येथील कोर्टातुन जामीन करून न्यायालयाची फसवणूक केली आहे , त्यावरून महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे कलम 419, 420, 462, 468, 71, 472, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला व एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली, या आरोपींकडून बनावट 45 रबरी स्टँम्प 51 बनावट रेशनिंग कार्ड , 318 ग्रामपंचायत कर पावत्या , बनावट आधार कार्ड व इतर संशयित कागदपत्रे जप्त केलेली आहेत, ह्यातील आरोपी मुख्य आरोपी बनावट दस्तऐवज तयार करण्यात सराईत असुन तो या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे , अटक आरोपी हे जामिनदारास पैशाचे प्रलोभन दाखवुन त्यांच्या पँनकार्डच्या आधारे रेशनिंग कार्डावर कुटुंब प्रमुख म्हणुन त्याचे नाव लिहुन संबंधित कार्यालयातील सर्व शिक्के मारून हुबेहूब रेशनिंग कार्ड तयार करून , संबंधित ग्रामपंचायतीची बनावट कर पावती बोगस जामीनदार तयार करून कागदपत्रासह कोर्टात उभे करून जामीन करून देत असत , काही प्रसंगी आरोपींनी बनावट आधार कार्ड काढुन त्या आधारे बनावट रेशनिंग कार्ड व ग्रामपंचायत कर पावती तयार करून आरोपींना जामीन केल्याचे निष्पन्न झाले आहे , हे आरोपी बनावट रेशनकार्ड तयार करण्यासाठी भिवंडी येथील एका झेरॉक्स सेंटरची मदत घेत होते , ग्रामपंचायत नमुना नंबर 10 कर पावत्या ह्या उल्हासनगर येथील एका प्रिंटिंग प्रेस मधुन छापून घेत असत , तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 45 रबरी शिक्के हे सोलापूर येथुन तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे , तसेच ज्या ज्या कोर्टात बोगस जामीनदारानी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोर्टात उभे राहुन आरोपींना जामीन केला आहे अशा व्यक्तीचा शोध घेण्यात येणार आहे , या गुन्ह्याची व्याप्ती पहाता अजुन काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे , पुढील तपास उल्हासनगर युनिट 4 चे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील करत आहेत .

Sources – ABI News

Leave a Reply

Your email address will not be published.