मुंबईत तीन दिवसांचे राष्ट्रीय आमदार संमेलन – देशभरातील अडीच हजार आमदारांचा सहभाग

मुंबई दि.२६ :- एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे येत्या १५ ते १७ जून या कालावधीत मुंबईत तीन दिवसांचे राष्ट्रीय आमदार संमेलन आयोजिन करण्यात आले आहे. अशा प्रकारचे संमेलन पहिल्यांदाच होत असून संमेलनास देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे अडीच हजार आमदार उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठक – नाना पटोले

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जीओ सेंटर येथे हे संमेलन होणार आहे. देशातील सर्व विधानसभांचे अध्यक्ष आणि विधान परिषदांचे सभापती यांच्या संयुक्त सहकार्याने हे संमेलन होत असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सर्वागीण शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन‌ आणि संरक्षणासाठी चळवळ सुरु करावी- राज्यपाल रमेश बैस

संमेलनात ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार असून प्रत्येक सत्रांमध्ये ५० आमदार सहभागी होणार आहेत. प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधानपरिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे भूषविणार आहेत. यावेळी आमदार सीमा हिरे, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून हे राष्ट्रीय आमदार संमेलन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.