अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात दोन अपक्ष आणि क्रांतिकारी जय हिंद सेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.

दिवाळी सुट्टीनिमित्त, एसटीच्या विशेष गाड्या

राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना, हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष), नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दिवाळीनिमित्त ‘बेस्ट’ योजना

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस १४ ऑक्टोबर तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत आहे. मतदान ३ नोव्हेंबर तर मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.