प्रतीक गावडे खून प्रकरण अवघ्या २४ तासात तिघे आरोपी गजाआड कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई

डोंबिवली दि.२२ :- शेलारनाका परिसरात रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून तिघांनी प्रतीक गावडे या तरुणाची  हत्या झाली होती. या हत्याकांडानंतर काही तासातच  डोंबिवली पोलिसांनी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ याला अटक केली होती .तर चंदया जमादार, रवी लगाडे हे पसार झाले होते. अखेर कल्यान क्राईम ब्रँचने अवघ्या २४ तासात प्रतीकची हत्या करणारे रवी लगाडे आणि चंद्रकांत जमादार यांना अटक करून रामनगर पोलीसच्या ताब्यात दिले.

हेही वाचा :- आदिवासींच्या कोरड्या पाषाणात प्रकटला माणुसकीचा झरा तिसऱ्या प्रयत्नानंतर बोअरवेलला लागले पाणी

रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे या तिघांवर शस्त्राने  हल्ला करण्यात आल्याची घटना शेलार नाका डोंबिवली येथे घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेले प्रतीक गावडे याचा मृत्यू झाला तर  बाली जयस्वार, निलेश धुणे या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हे नोंद करत हल्लेखोर झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ, चंदया जमादार आणि रवी लगाडेचा शोध पोलीस घेत होते. हे तिघे सराईत गुन्हेगार होते.

हेही वाचा :- Kalyan ; भाजपाच्या उपमहापौर उपेक्षा भोईर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता…?

त्याच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर तसेच टिळक नगर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने वार करणे, दहशत माजवणे, रॉबरी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. काही तासात डोंबिवली पोलिसांनी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ याला अटक केली होती. तर या गुन्ह्यांचा समांतर तपास कल्याण क्राईम ब्रांच करत होती. तपासादरम्यान दोघे आरोपी कचोरेगांव ९० फीट रोड लगत गावदेवी मंदिराच्या मागील बाजूस लपून बसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली.

हेही वाचा :- डोंबिवलीतील मॅरेथॉन स्पर्धेत ६५०० स्पर्धक धावले

जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या सदर  ठिकाणी सापळा रचला मात्र आरोपींना पोलिसांचा संशय आल्याने ते ९० फिट रोडने  कल्याण पत्रीपुलकडे पळत असताना वरील पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने रवी लगाडे व चंद्रकांत उर्फ चंदू जमादार या दोघांना पकडले सदर आरोपीत हे  रेकॉर्ड वरील खतरनाक गुन्हेगार असून डोंबिवली रामनगर तसेच टिळक नगर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने वार करणे, दहशत माजवणे, रॉबरी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत सदर दोन्ही आरोपीत याना पकडून पुढील कारवाई करिता डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सपोनि दायमा, पोउपनिरी नितीन मुदगुन, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, मंगेश शिर्के, अरविंद पवार, निवृत्ती थेरे, सचिन साळवी, प्रकाश पाटील, राहुल ईशी हे  पोलीस आधिकारी, पोलिस कर्मचारी पथकात होते.

Hits: 1

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email