कॅमेरा पाहण्याचा बहाणा करत चोरट्यांनी कॅमेरा लांबवला
कल्याण दि.१४ – कल्याण पूर्व विठ्ठलवाडी डेपो येथील विनायक कॉलनी चाळीत राहणारे सुरज सोनार हे रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील किराणा दुकानासमोर उभे होते. यावेळी दोन अज्ञात इसम दुचाकीने त्याच्याजवळ आले.
हेही वाचा :- अपघातात कुत्रा जखमी ,कार चालकावर गुन्हा दाखल
त्यांनी त्याच्याकडे असलेला कॅमेरा भाड्याने मागितला व बघण्यासाठी स्वताकडे घेतला. कॅमेरा हातात पडताच या दोघा इसमांनी तेथून धूम ठोकली या प्रकरणी सुरज यांनी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: