डोंबिवलीतून हजारो शिवसैनिक पंढरपुरला रवाना

डोंबिवली दि.२३ – पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चंद्रभागा मैदानावर होणाऱ्या महासभेसाठी डोंबिवलीतून हजारो शिवसैनिक रविवारी रवाना झाले. शहरप्रमुख राजेश मोरे यांनी बसमधील प्रवाशी सैनिकांचा पंढरपूर प्रवास सुखरुप व्हावा यासाठी श्रीफळ वाढवून सैनिकांना शुभेच्छा दिल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी पूर्वेकडील मानपाडा रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय दणाणुन गेले. विशेष म्हणजे डोंबिवली शहरातून शिवसेना पदाधिकारी आपल्या खाजगी वाहनातून आपल्या कुटुंबासमवेत पंढरपुरला महासभेसाठी जाणार असल्याची माहिती स्थायी समिती माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिली.

हेही वाचा :- डोंबिवली ; दर मंगळवारी व चौथ्या शनिवारी २४ तास पाणी पुरवठा बंद

यावेळी कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, संघटन प्रमुख तात्यासाहेब माने, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, सुधीर पाटील, सोपान पाटील, कविता गावंड, किरण मोंडकर, मंगला सुळे विवेक खामकर, यांच्यासह पदाधिकारी महिला पुरुष सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होतो. मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या वीस बसेस पंढरपूरला जाण्यासाठी आरक्षित केल्या असल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले. रविवारी दुपारी एक वाजता बसेसच्या ताफा पंढरपुरला रवाना झाला. महिला सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पंढरपुरला महासभेसाठी जाण्याचे तंतोतंत नियोजन करण्यात आले असून पंढरपुर येथील आगरी धर्मशाळेमध्ये संपूर्ण सैनिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.