मतदार नोंदणी, मताधिकार- लोकशाहीचे सक्षमीकरण या विषयावर जनजागृती करण्यासाठी लोकशाही टिकविण्यासाठी मतदानाला पर्याय नाही, मतदार यादीतील तरुणाईचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न, आम्ही मतदान करणार कारण, शहरी मतदारांची अनास्था कारणे आणि उपाय असे विषय सुचविण्यात आले आहेत.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे असून द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे ५१ हजार आणि २१ हजार रुपयांचे आहे. तर दहा देखाव्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.