यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई :- करोना संसर्गामुळे दहीहंडी, गणेशोत्सव असे महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आली होती. मात्र या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवीली जाणार आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. निर्बंध होते. इच्छा असूनही उत्सव साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षांतील मर्यादा पाहता यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्साहात साजरे झाले पाहिजेत, हा उत्सव साजरा करताना नियमांचा बागुलबुवा नको, असेदेखील अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुंबईतील नियमावली राज्यभर लागू असेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Hits: 8

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email