राजकारण आहे ! हे असे होणारच।

हे असे होणार !

गतीमान राजकारण आणि सत्तेचा प्रभाव बारकाईने अभ्यासता आला नाहीतरी, नकारात्मकता न बाळगता तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांचे बोलणे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीने किंबहूना त्यांना हवे तसे असे त्या बोलण्याचे इंटरप्रिटेशन केले जाते. त्याचप्रमाणे दिपक केसरकर यांचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हवे तसे आहे असा अर्थ निघतो. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना सोईचे दिपक केसरकर बोलत आहेत असे वाटणे गैर नाही.

हे ही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेड्युलमध्ये नसलेली गळाभेट

एकनाथ शिंदे यांचे बंड हे उद्धव ठाकरे यांच्या संमतीने अशी घडवलेली चर्चा, आदित्य ठाकरे यांच्यावर बाळासाहेब यांचा नातू म्हणून कारवाई नको अशी भूमिका, भाजपा-एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार यांना पाठिंबा देण्याचा शिवसेना खासदारांचा आग्रह उर्फ दबाव, शिवसेनाचा बिनशर्त पाठिंबा, आधी निंदा करणाऱ्या शीतल म्हात्रे यांच्यासारख्यांचे एकनाथ शिंदे गटात सामील होणे, सर्व बंडखोरांनी म्हणजे उठाव करणाऱ्यांनी सातत्याने बाळासाहेब यांचे शिवसैनिक आणि त्यांचे हिंदुत्व असेच म्हणत रहाणे, मातोश्रीवर जाऊ पण काही अटी असे म्हणणे, राष्ट्रवादी काँग्रेसची बंडखोरांवर टिका, माजी शिवसैनिक छगन भुजबळ यांचे सक्रिय होणे, राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षण विषय हाती घेणे, आरे येथील आंदोलन, दिपक केसरकर यांचे वक्तव्य, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर टिका आणि अद्याप न झालेला मंत्रीमंडळ विस्तार यात काही सुसूत्रता आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे.

हे ही वाचा – एकनाथ, हिमंत- घराणेशाहीच्या पर्वत भेदून उसळलेले दोन ज्वालामुखी…

अश्यावेळी भाजपाच्या पारंपरिक कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आपली राजकीय समज सक्षम करणे गरजेचे आहे. त्यावेळी जनसंघ आणि भाजपा निवडणूकीतील पराजयाने निराश न होता कार्यरत रहाणारे कार्यकर्ते आणि समर्थक मतदार म्हणजे “जागरूक नागरिक” यांच्या पुन्हा-पुन्हा उभे रहाण्याने सत्ता आली आहे.

येणाऱ्या सत्तेला अनेक पदर असतात. सत्तेचे राजकारण वेगळे असते. वेगवान असते. “राष्ट्र प्रथम” या भावनेने अंत्योदय यासाठी सत्ता यावर विश्वास ठेवणाऱ्यांची जबाबदारी अधिक आहे.

पद, प्रतिष्ठा, अधिकार यासाठी सत्ता असा वाटणारा गट ही रहाणार. त्या गटाची महत्वाकांक्षी स्वाभाविक आहे. मात्र अश्या गटाला हाती धरून सर्वांगीण विकास करण्याचे कौशल्य विकसित करावे लागेल.

आदर्श, तत्व, नैतिकता, मूल्य हे न सोडता सत्तेच्या राजकारणाचे सामर्थ्य लक्षात घेऊन ते “सर्वजनहिताय-सर्वजनसुखाय” यासाठी होत आहे ना ? याविषयी सजगता बाळगावी लागेल.

हे ही वाचा – चहावाला ते रिक्षावाला व्हाया चौकीदार

त्यावेळी असे नव्हते, पूर्वी कधी असे झाले नाही, तेंव्हा राजकारण बरे होते असे कढ काढण्याने उत्तर मिळणार नाहित. त्यावेळी राजकरण तसेच होते म्हणून ते आज असे आहे. पेरले तेच उगवते. त्यावेळी सत्ता दुरुनही बघता आली नव्हती आणि आज त्याच सत्तेच्या केंद्रस्थानी हाच मोठा फरक आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदू विरोधी सापळ्यात न फसता राजकारण आणि सत्ता समजून घेणे सोईचे ठरले. भाजपा योग्य की अयोग्य, शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा जुळवून घ्यावे की नाही यावर चर्चा स्वाभाविक आहे. पण, यात फारसे न अडकता ‘पथ का अंतिम लक्ष्य” यावर लक्ष केंद्रित करणे उपयोगी ठरेल.

चुका करतील त्यांना भरपाई करावी लागेल. निवडुंगाला प्राजक्ताची फुलं येत नाहित.
प्राजक्ताची बी पेरणाऱ्यांना आम्ही पेरले सांगावे लागत नाही कारण बहर दिसतो.
त्या बहराचे वाहक होण्यासाठी विरोधकांचे डावपेच ओळखावे लागतील.

मकरंद मुळे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार 

Leave a Reply

Your email address will not be published.