तिसऱ्या भारत-जपान पर्यावरण परिषदेचे नवी दिल्लीत आयोजन

नवी दिल्ली, दि.१४ – ‘स्वच्छ हवा आणि हरित अर्थव्यवस्था’ या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या भारत-जपान पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आदी मुद्यांसमोरील आव्हाने आणि उपाय यावर या परिषदेतील चर्चासत्रात विचार करण्यात आला. केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या परिषदेचे उद्‌घाटन केले.

हेही वाचा :- डोंबिवली ; घरफोडी साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, शहरी पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, हरित तंत्रज्ञान आदी विभागात भारत आणि जर्मनी यांच्यात गेल्या 60 वर्षात महत्त्वपूर्ण सहकार्य होत असल्याचे ते म्हणाले. जर्मनी हा भारताचा द्विपक्षीय आणि जागतिक संदर्भात महत्त्वाचा भागीदार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिषदेत विविध मंत्रालये, उद्योग, विज्ञान क्षेत्रातील तसेच स्वयंसेवी संघटनांचे सुमारे 250 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेमुळे उच्चस्तरीय धोरणकर्ते आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींमध्ये द्विपक्षीय देवाणघेवाण होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email