प्रोबेस स्फोट दुर्घटना प्रकरणी तीन वर्षानतरही नुकसान भरपाई नाही

डोंबिवली दि.१८ – २६ मे २०१६ रोजी डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला यामध्ये २६६० रहिवाशांच्या इमारती व मालमत्तेचे नुकसान झाले व त्यात ७ कोटी,४३ लाख,२७ हजार ,९९० रुपये एवढी रक्कम रहिवाशांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळण्याचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयाने शासनाला सादर केला  सरकारने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले मात्र तीन वर्षानंतरही याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून हे नागरिक येत्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेबेस कंपनीच्या स्फोटात ज्यांचे  नुकसान झाले त्याना जी नेाटीस दिली त्यात प्रेबस कंपनीच्या इन्शुरन्स कंपन्याकडे नुकसान मिळावे  यासाठी अर्ज करावे असा सल्ला देण्यात आला आहे.

एका परीने राज्य शासनाने आपले हात वर केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.प्रेबेस कंपनीतील बाधितांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकणार नाही असे लेखी पत्र ८ आॅगस्ट २०१७ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवले होते.बाधितांनी नुकसान भरपाई मिळावी वी यासाठी कंपनी विरोधात दावा करावा अशी सूचनाही त्यात करण्यात आली होती रहिवाशांचे म्हणणे असे की राज्य शासनाने आम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन दिले होते ते आम्हाला मिळाले पाहिजे आता मात्र शासन हात वर करत आहे. याचा निषेध करण्यासाठी व नागरिक आता लोकसभा निवडूकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.