गोडावून मध्ये चोरी – डोंबिवलीमधील घटना
डोंबिवली दि.२० – डोंबिवली पूर्वेकडील एम आय डीसी फेज २ येथील दुर्वांकुर हॉल येथे राहुल कांगणे याचे मातोश्री इंटरप्रायझेस नावाने गोडावून आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या गोडावून च्या दरवाजाचे कुलूप तोडून गोडावून मधील लेपटोप ,दोन सी सी टी व्ही कमेरा ,रोख रक्कम ,सोन्याचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी हि बाब निदर्शनास आल्या ने कांगणे यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- मुजोर रिक्षाचालकांची लुट सुरूच डोंबिवली ते कल्याण ४०० रुपये रिक्षाप्रवासी भाडे
Please follow and like us: