कमळ फुलवण्यासाठी झटणारा कार्यकर्ता गेला

 

कर्मभूमी डोंबिवली आणि ध्यास कमळ फुलवण्याचा असे जणू समीकरण आहे. राजकारणातील राष्ट्रीय विचार रुजवण्यासाठी डोंबिवलीत त्यावेळी मध्यमवर्गीय सामान्यांनी पुढाकार घेतला होता. घरच खाऊन लष्कराच्या भाजण्याचा तो काळ होता.

रा.स्व.संघ विचाराने प्रेरित तरुणाई विविध संघटनांच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाली होती. अशोक गोडबोले हे त्या काळाचे प्रतिनिधी होते. भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर राष्ट्रीय कामगार युनियनमध्ये सक्रिय होते. भाजपाचे काम केले. विविध पदांवरून राजकीय क्षेत्रात सक्रिय होते.

हिंदू चळवळीची प्रासंगिक काम त्यांनी केली होती. अशोक गोडबोले यांची पत्नी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची नगरसेविका होती. आपल्या पत्नीच्या दुर्धर आजारपणाचे आणि निधनाचे दुःख पचवून अशोक गोडबोले आपल्या कन्यांसाठी उभे राहिले होते.

उल्हासनगरचे भाजपा आमदार कुमार आयलानी यांचे काम त्यांनी पाहिले. गेली काही वर्ष आपले आजोबापण त्यांनी एन्जॉय केले होते. दुबईत मुलीकडे जाऊन तिच्या कौतुकानिमित्त आपल्या वॉलवर दुबई सफर पोस्ट केली होती.

मधुमेहाने त्रस्त असलेले अशोक गोडबोले आपले कार्यकर्तापण टिकवून होते. हसरे आणि कधी फोन करणारे अशोक गोडबोले गेले तीन दिवस रुग्णालयात होते. अगदी काहीवेळा पूर्वी अनिल भदे यांनी आपल्या मित्राच्या निधनाची दुःखद बातमी कळवली. स्वर कातर होता. अशोक गोडबोले यांचा सारखा कार्यकर्ता ही संघटनेची श्रीमंती असते.

हे असे सामान्य कमळ फुलवण्यासाठी झटल्याने आजची पिढी सत्ता जवळून पहात आहे. सत्तेचा भाग आहे. सत्ता टिकवण्यासाठी कार्यकर्तापण जपणे आवश्यक आहे. नेतागिरी करताना कार्यकर्तापण टिकवणे ही अशोक गोडबोले यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

मकरंद मुळे यांच्या फेसबूक वॉल वरून साभार 

Leave a Reply

Your email address will not be published.