कचरा न उचलल्याने मतीमंद मुलीला मारहाण

डोंबिवली दि.१३ – डोंबिवली पूर्व देसलेपाडा येथे लोढा हेरीटेज चंद्रेश शहनाई इमारती मध्ये सुमन चरेगावकर या ६४ वर्षीय महिला आपल्या मतीमंद मुलीसह राहते . सोमवारी सकाळच्या सुमारास सुमन यांनी आपल्या मुलीला वडिलांचा जेवणाचा डबा घेवून पूर्वीच्या राहत्या घरी पाठवल असताना त्या घराचा दरवाजा उघडत होत्या.

त्यावेळी शेजारी राहणाऱ्या दीक्षा कांबळे ,सेजल कांबळे यानी मुलीला घरासमोरील कचरा उचलण्यास सांगितले .मुलीने नकार देताच संतापलेल्या दीक्षा कांबळे ,सेजल कांबळे यांनी घरात घुसून मतीमंद मुलीला मारहाण केली .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी दीक्षा कांबळे ,सेजल कांबळे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email