केळकर पथावरील रुंदीकरणाचे काम ठेकेदारांचे बिल थकल्याने रखडले

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२८ – डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिकेने केळकर रस्त्यावरील महावितरण कपंनीचे ट्रान्सफॉर्मर व अतिउच्च दाबाच्या वाहिन्या हलवण्याचे काम सुरु केले होते. मात्र गेले काही महिने सुरु असलेले काम गेले तीन महिने बद पडले आहे. महावितरण कपंनीने त्याचे काम पूर्ण केले असले. तरी त्या रस्त्याचे रुंदीकरण काम गेले तीन महिने बंद पडले आहे या संदर्भात चौकशी केली असता महापालिकेने हे काम करणार्या ठेकेदारांचे लोखो रुपयांचे बिल थकवले आहेत. बिल दिले तरच काम पूर्ण करण्याचा पवित्रा ठेकेदारांनी घेतल्याने हे काम रखडले आहे यामुळे अगोदरच अरुंद असणार्या रस्त्यावर अर्धवट काम झाल्याने मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे यामुळे रिक्षा चालक नागरिक त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पूर्वेच्या स्टेशनजवळ पाटकर पथाला लागून केळकर रस्त्याच्या कोपऱ्यावर महावितरण कपंनीचे उच्च दाबाच्या विज वाहिन्या व ट्रान्सफार्मर आहेत.

येथून सर्व डोंबिवलीला वीज पुरवठा होतेा. वाहतूकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन सध्या केळकर रोड १२ मीटर रुंद असून एका हॉस्पीटलच्या कॉर्नरवर अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या व ट्रान्सफार्मर आहे. स्टेशन परिसरातील होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केळकर रस्त्यावर असलेल्या वीज वाहिन्या मागे घ्याव्यात व टा्रन्सफार्म बाजी प्रभु चौकात हलवण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे येथील ट्रान्सफॉर्मर सहा महिन्यापूर्वी हलवण्यात आले आता तेथे फक्त उच्च दाबाच्या विज वाहिन्या बाजूला करण्याचे काम आहे. उंदे्र इलेक्ट्रीकल कंत्राटदार व आर के मदानी या ठेकेदारांना देण्यात आले गेले वर्षभर या रस्त्याचे काम सुरु आहे पण आता काही मोजकेच काम शिल्लक असल्याने बिल दिले तरच काम पूर्ण करण्याचे ठेकेदारांनी पालिकेला कUवले या संदर्भात एका ठेकेदाराने गेल्या मे पासून आमचे लाखो रुपयांचे बिल थकल्याचे मान्य केले पालिकेचे अधिकारीही पालिकेची आर्थिक स्थिती मुळे बिल थकल्याचे मान्य केले मात्र आता येत्या काही दिवसात बिले अदा केली जातील व काम सुरु होईल असे सांगीतले.डोंबिवली महावितरण कपंनीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता त्यानी महावितरण कपंनीचे सर्व काम झाले असून आता त्या भागावर सिमेंट कॉंक्रीटीचे किंवा पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पालिकेने करायचे आहे ज्या वाहिन्या आहेत त्या खाली दाबून टाकण्यात येणार आहेत व हे काम पालिकेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email