देवीच्या पाडा येथील चाळीची भिंत कोसळली

डोंबिवली दि.०८ – चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचे हाल झाले. यात चाळीतील घरांचे अतोनात नुकसान झाले होते. डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील दत्तात्रय कृष्णा भोईर चाळीतील दोन घरांच्या पाठीमागील भिंत कोसळली.

हेही वाचा :- डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचे प्लास्टर पडून भाडेकरूंचा मृत्यू

यामुळे घरातील कुटुंब घाबरले असून या घराच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. प्रकाश मुंणगेकर आ गोविंद कोर्लेकर यांच्या घरातील भिंत कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. जवळपास  १८ वर्ष या चाळीतील हे दोन कुटुंबीय भाडे तत्वावर राहतात. या चाळीची जागा रेल्वे प्रकल्पात जात आहे. काल संध्याकाळी उशिरा भिंत कोसळली ,सुदैवाने यात कोणी जखमी जखमी झाले नाही.

Ulhasnagar Dance Bar उहल्लासनगर में डांस बार चालक बेख़ौफ़ अश्लील नृत्य बेरोकटोक
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email