कोरोना समुपदेशन समिती आणि कल्याण मनपा यांच्या संयुक्त विदयमाने लसीकरण शिबिर राबवण्यात आले.
नागरिकांची मोठया प्रमाणात असलेली मागणी आणि लसीचे आजच्या काळात असलेले महत्त्व लक्षात घेता कोरोना समुपदेशन समितीने पालिकेला सहकार्य करून कल्याण येथील पुण्यार्थी सर्व्हिसिंग सेंटर, पुण्यार्थी टाॅवर, बेतूरकर पाडा, येथे लसीकरण शिबिर राबविले.
पुण्यार्थी क्रिएटिव्ह वर्ल्ड हया संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत पुण्यार्थी यांच्या हस्ते हया शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरास पुण्यार्थी क्रिएटिव्ह वर्ल्ड हया संस्थेने देखिल सहकार्य केले
लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी *समितीचे अध्यक्ष श्री. अनिल काकडे व सर्वश्री प्रथमेश पुण्यार्थी, मेहुल पुण्यार्थी, एकनाथ जाधव, सचिन देशमुख, हंसराज घोलप, गंधर्व घोलप, रिषी घोलप, शकुंतला राय, सुषमा सहस्त्रबुद्धे, प्रज्ञा पुण्यार्थी, नेहा पुण्यार्थी, जिग्ना ठक्कर* इत्यादींनी परिश्रम घेतले.
शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.