लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना १ महिन्यांचा तुरूंगवास

 

कोल्हापूर – जयसिंगपूर न्यायालयाने लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या सहा आरोपींना दंडाची तर होम क्वारंटाइनचे उल्लंघन करणाऱ्या दोघांना एक महिना तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

शिरोळ पोलीस ठाणे येथे कोरोना संदर्भात दाखल गुन्ह्यांतील आरोपींना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही आरोपी शिरोळ येथील रहिवासी आहेत.

हे दोन्ही आरोपी होम क्वारंटाइनमध्ये असतानाही घरातून बाहेर पडत विनाकारण फिरत होते. त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १ महिन्याची शिक्षा ठोठावल्याने त्यांची बिंदू चौकातील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या या दोनही आरोपींना एक महिन्याची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे.

तर इतर चार आरोपींना न्यायालयाने १६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.