जी २० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारपासून मुंबईत
मुंबई दि.१३ :- भारताच्या अध्यक्षतेखाली जी २० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तीन दिवसीय तिसरी बैठक मुंबईत सोमवारपासून सुरु होणार आहे. बैठकीला सदस्य देशांसह विशेष आमंत्रित अतिथी देश, आंतरराष्ट्रीय ऊर्जासंस्था, जागतिक बँक, भारतीय जागतिक ऊर्जापरिषद आदींचे शंभराहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
‘महारेरा’चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४५७ दलालांची २० मे रोजी परीक्षा
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंह भल्ला, खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना या बैठकीतस उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे बैठकीच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत. ‘न्याय्य उर्जा संक्रमण पथदर्शी योजना, जैवइंधन, किनारपट्टीवरील वारे याविषयावरील परिसंवाद तसेच परिसंवाद, कार्यशाळा आदि कार्यक्रम होणार आहेत.