सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित निकाल दिला – मुख्यमंत्री शिंदे
तेव्हा नैतिकता कुठे गली होती?- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि.११ :- काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला- उद्धव ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नैतिकतेबद्दल बोलू नये. त्यांनी खुर्चीसाठी विचार सोडला. एकनाथ शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. आपल्याकडे बहुमत नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्या लाजेपोटी आणि भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिलात. विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढविण्याचा प्रयत्न करू नका, असेही फडणवीस यांनी यावेळी सुनाविले.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या परिचारिकांचा मोर्चा
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित निकाल दिला. अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयांच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली. पक्षचिन्हही आम्हाला दिले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तेव्हा परिस्थितीनुसार निर्णय घेतला. जर बहुमत चाचणी झाली असती आणि पराभव झाला असता तर राज्यपालांचा निर्णय योग्य होता असे म्हटले असते का? पूर्णपणे बहुमत आमच्या सरकारच्या बाजूने होते, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.