डोंबिवली दि.१४ :- कोणतीही अपेक्षा न ठेवता संगीताचा अभ्यास करणे म्हणजेच संगीत साधना आहे, असे प्रतिपादन पं. मुकुंद मराठे यांनी येथे केले. डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शंकर महादेवन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकनगर विद्या मंदिरात सुरू करण्यात आलेल्या ‘संगीत प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात पं. मराठे बोलत होते. मुंबईतील शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शंकर महादेवन अकादमीचे विश्वस्त श राजेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत संगीताचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख कृष्णन शिवरमकृष्णन यांनी दिली. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांचेही भाषण यावेळी झाले. आशीर्वाद बोंद्रे यांनी प्रास्ताविक तर रिद्धी करकरे यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना जोशी यांनी आभार मानले.