विद्यार्थीनीने रस्त्यावर पेट्रोल टाकून स्वता: ला केला जाळण्याचा प्रयत्न
एका खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्ष बी.कॉम शिकणार्या विद्यार्थीनीने अज्ञात कारणास्तव रस्त्यावर पेट्रोल टाकून स्वता: ला जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ९५ टक्के जळालेल्या विद्यार्थीनीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार कोयंबटूर येथील एका खासगी महाविद्यालयात ही घटना घडली.
हेही वाचा :- Thane ; नशा करण्यासाठी ६० किलो कांद्यांची चोरी
ही मुलगी या महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायची, मंगळवारी पहाटे ५.३० वाजता ही मुलगी आपल्या रूममेटला सांगून खोलीबाहेर आली आणि मग रस्त्यावर गेल्यानंतर तिने पेट्रोल डब्यातून अंगावर पेट्रोल टाकुन स्वता:ला पेटवून घेतले. मुलगी रस्त्यात जळत असल्याचे पाहून काही वाहनचालक तिला वाचवण्यासाठी आले व त्यांनी ती आग विझून तिला दवाखान्यात नेले. विद्यार्थी ९५ टक्के जळालेला आहे. कोंबतूर पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरतेने तपास सुरू केला आहे.