अकोले आगाराच्या अनागोंदी कारभार

( म. विजय )

अकोले आगाराच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेंडी येथील एका सुशिक्षित बेकारास बसला असुन अकोले कसारा ह्या गाडीच्या चालकाने बस शेंडी येथील बसथांब्यावर न आणल्यामुळे या युवकास बँकेच्या मुलाखतीस मुकावे लागले .
सविस्तर वृत्त असे की शेंडी येथील भाऊसाहेब खाडे हा आदिवासी सुशिक्षित युवक बँकेच्या मुलाखतीसाठी मुंबई येथे जाणार होता . ही मुलाखत मुंबई येथे सोमवारी जरी असली तरी सोमवारी शेंडी येथुन मुंबई गाठणे शक्य नसल्याने हा युवक शेंडीच्या बसथांब्यावर मुंबईच्या काही पर्यटकासह थांबलेला होता . अकोले येथुन दुपारी चार वाजता सुटणारी अकोले कसारा ही बस शेंडी येथे साडेपाच वाजता येते .

रविवारी या गाडीच्या चालकाने शेंडीच्या बसथांब्यावर गाडी न आणताच परस्पर निघुध जाणेच पंसत केले . अकोले आगाराच्या चालकाच्या या मनमानीमुळे सदर युवकाला मुंबई येथे खाजगी गाडी करुन मुलाखतीसाठी जावे लागले . प्रवाशाच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य असणारी एस टी महामंडळाचे घोषवाक्य चालक वाहकांच्या सेवेसाठी असे म्हणण्याची वेळ आता अकोले आगाराची झाली आहे . अकोले आगाराच्या प्रमुखाशी या संदर्भात भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनीही असमर्थता दाखविले .

अकोले आगाराच्या अनेक गाड्या अशाच पद्धतीने शेंडीच्या बसथांब्यावर ईतर वाहनांची अडचण हे कारण दाखवुन परस्पर निघुन जातात . राजुर येथील बसथांब्यावर पोलिस स्टेशध पासुन प्रचंड प्रमाणात वाहनाचा अडथळा असताधाच तेथे मात्र बसथांब्यावर या चालक व वाहकांना गाडी सुरक्षित नेता येत मग शेंडीच्याच बसथांब्यांची यांना का अडचण झाली आहे , हा मोठा प्रश्न तयार झाला आहे .

शुक्रवारी दुपारी अकोले आगाराच्या घाटघर गाडीने बाजार असुन सुद्धा शेंडीला गाडी न आणता परस्पर घाटघर फाट्यावरुन घाटघरला जाणे पसंत केले . अकोले आगाराच्या अनेक बसेसचे चालक व वाहक अशाच पद्धतीने कायम प्रवाशांशी खेळत असुन या अगोदर एकदा शेंडीतील तरुणांवर गाडी परस्पर नेल्यामुळे नौकरीला मुकावे लागण्याची वेळ आली होती . आता पुन्हा एकदा या आदिवासी युवकाच्या बाबतीत हा प्रकार घडला या चालक व वाहकाची तक्रार थेट परीवहन मंत्री साहेबांकडे करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.