डोंबिवली ; मराठी भाषेचे महत्व वाढवण्यासाठी राज्यशासनाने स्थापन केले आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड 

डोंबिवली दि.१४ सीबीएससी, आयसीएसई शाळेत विद्यार्थ्यांना घालण्याचा पालकांचा वाढता कल आहे. या शाळांचे महत्व कमी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतःचे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड (एमआयईबी) शासनाच्यावतीने स्थापन केले आहे. आंतरराष्ट्रीय जाणीवा समृद्ध करणारे शिक्षण मातृभाषेतून देता यावे तसेच यासोबत मराठी माध्यमाच्या शाळांकडे पुन्हा पालकांचा कल वाढावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ व कल्याण येथील सेंच्युरी रे्यान शाळेचा यात समावेश आहे.  राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या. राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे (एमआयईबी) पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली होती. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील खासगी मान्यताप्राप्त 64 मराठी माध्यम शाळांची निवड करण्यात आली आहे. 

 हेही वाचा :- डोंबिवली ; अवाजवी फीविरोधात ‘सिस्टर निवेदिता’वर धडक, पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखले

विश्वस्त सल्लागार मंडळाची यासाठी नेमणूक करण्यात आली असून या समितीवर डॉ.अनिल काकोडकर, डॉ.विजय भाटकर, सोनम वांगचूक, डॉ.स्वरुप संपत, अच्युत पालव या तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. काही निवडक शाळांसाठी एमआयईबी बोर्ड मान्यता देण्यात आली आहे. मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे, स्वयंअध्यनास प्रवृत्त करणे, पंचाकोशाधारित मूल्यमापन व्यवस्था निर्माण करणे. भारतीय मूलभूत ज्ञान व वर्तमान स्थिती यांची उत्तम सांगड घालता येणे सहज शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे हा मागचा उद्देश असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.  पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यास सुरुवात केली गेली आहे. या शाळांना अंगणवाडीही जोडण्यात आल्या आहेत. नंतर नैसर्गिकपणे पुढे वर्ग वाढत जाणार आहेत. शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देता यावे यासाठी 30 ते 35 विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित करण्यात आली आहे.मुलांचे वार्षिक मुल्यपापन हे केवळ लेखी परिक्षेवरुन नाही तर शिक्षकांचा अनुभव व पालकांना मुलांची किती प्रगती दिसून येते, असे पंचाकोशाधारीत मुल्यपापन केले जाणार आहे.मराठी भाषेचे महत्व वाढवण्यासाठी राज्यशासनाने स्थापन केले आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड 

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email