बेशिस्त आणि अपूर्ण रस्त्यामुळे उरण शहराला पावसाळ्यात पुराचा धोका.

उरण दि.०९ – उरण शहरात रस्त्याचे क्रॉक्रींटीकरण सुरु असून सुमारे 42 कोटी रुपये खर्चाचे काम साधारणपणे जानेवारी 2018 पासून सुरु आहे. परंतु सदर कामे होत असताना संबंधित ठेकेदार, नगर परिषद आणि नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे गेल्या दिड वर्षापासून वाहतुक कोंडी, रस्ते अपघात, धुळीचे प्रचंड प्रदूषण आदि समस्यांना नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कामाची शहानिशा करून संयुक्त पाहणीची वेळ निश्चित करावी, उरण शहरातील रस्त्याची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावित,रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे केली आहे. उरण शहरात रस्त्याचे कोंक्रीटीकरण करण्याची बहुतांश कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक ठिकाणी पूर्ण रुंदिचे पॅचेस अनेक महीन्या पासून शिल्लक राहीलेले आहेत.  राजपाल नाका ते पेंशनर्स पार्क या केवळ पाव किमी पेक्षा कमी लांबीच्या रस्त्यावर बारा ठिकाणी असे अपूर्ण रुंदीचे पॅचेस आहेत. राजपाल नाक्यावर तर सुमारे एक फूट खोलिचा गैप आहे.  यावरून रस्त्याच्या परिस्थितिचे गांभीर्य लक्षात येईल.
सदर ऊंच सखल रस्त्यामुळे वाहने विशेषतः मोटारबाईक एकमेकावर आदळण्याचे आणि त्यामुळे भांडणाचे अनेक प्रकार घडले आहेत. पालवी हॉस्पिटल समोरिल रहदारीचा एका बाजुचा रस्ता एक वर्षापूर्वी खोदलेला आहे. परंतु तेथे कुठल्याही प्रकारचे संरक्षण पार्टिशन लावलेले नाही. काही ठिकाणी संरक्षण पार्टिशनसाठी एम एस पत्रे,लोखंडी पत्रे यांचा वापर केलेला आहे ते अत्यंत धोकादायक आहे. सदर रस्त्याच्या अर्धवट व बेशिस्त कामामुळे वाहनाचे विशेषत मोटार सायकल, रिक्षा,कार इत्यादि लहान वाहनांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर दुरावस्था उरण शहरातील कोंक्रिटीकरण केलेल्या सर्वच रस्त्यावर दिसून येते. रस्त्यावर कुठेही सूचना फलक नसल्याने बाहेरुन येणाऱ्या प्रवाश्यांची तर अधिकच कुचंबना झाली आहे. या परिस्थितीत भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर रस्त्यावर अपघात घडल्यास त्याला नगर परिषद जबाबदार असेल त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापुर्वी उरण शहरातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने उरण नगर परिषदेकडे लेखी निवेदन देउन केले आहे. रस्त्याची कामे पावसाळा पूर्वी न झाल्यास तसेच गटारांच्या अर्धवट बांधकामामुळे उरण शहरात पावसाळ्यात पुरसदृश्य परिस्थिति निर्माण होणार आहे.त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेवून रस्त्याची व गटारे बांधण्याची कामे पावसाळापूर्वी तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी आता जनतेतूनही पुढे येउ लागली आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email