कामगार वर्गांनी केला आ.मनोहर भोईर,कामगार नेते महेंद्र घरत यांचा जाहिर निषेध.
उरण दि.१९ – ऑल कार्गो कंपनीतील व्यवस्थापनाने कोणतेही कारण नसताना येथील 131 स्थानिक कामगार, प्रकल्पग्रस्त कामगार यांना अचानक कामावरुन कमी केल्याने येथील येथील कामगार वर्गांवर उपासमारीची वेळ आली आहे जर कंपनी प्रशासनाने 20 तारखेपर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास, योग्य प्रतिसाद दिला नाही तर 21/2/2019 सकाळी 10 वा. पासून कामगार,प्रकल्पग्रस्त, महिला वर्ग आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधि हे कंपनीसमोरच बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरु करणार असून परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी कंपनीच्या अधिका-यांवर राहिल असा इशारा कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी दिला. कोप्रोलि येथील ऑल कार्गो कंपनीतील 131 कामगार वर्गांना कामावरुन अचानकपणे कमी केल्याने कामगार वर्गांतर्फे ऑल कार्गो कंपनीच्या गेट समोरच दि 6/2/2019 पासून आंदोलन सूरु आहे मात्र कामगार वर्गांना अजूनही कामावर रुजू करून न घेतल्याने पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते याप्रसंगी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी कामगार वर्गांची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी श्रुती म्हात्रे बोलत होत्या.
हेही वाचा :- दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा झाली
यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, मनसे उरण शहराध्यक्ष जयंत गांगण, माजी जिल्हा परिषद सदस्य-जीवन गावंड, अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघटना अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे, काँग्रेस युवा नेता अजित म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता रूपेश पाटिल, काँग्रेस विभाग प्रमुख यशवंत म्हात्रे,शेकाप युवा नेता नीलेश पाटिल,जनार्दन भोईर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. उरण तालुक्यातील कोप्रोलि येथील मे. ऑल कार्गो लॉजिस्टिक प्रा. ली. कंपनीतील 131 कामगारांना अचानकपणे,कोणतेही चूक नसताना कामावरुन कमी केले आहे. या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे या करिता 6/2/2019 पासून कंपनीच्या गेट समोर कामगार वर्गांनी आंदोलन सुरु केले आहे.भुमीपुत्र शेतकरी संघर्ष समिती ही कामगार संघटना येथे कार्यरत असून सदर आंदोलन प्रकल्पग्रस्त कामगार, स्थानिक कामगार व सर्वपक्षिय लोकप्रतिनिधि यांच्या सहकार्याने सुरु आहे. विठ्ठल दामगुडे(सहाय्यक पोलिस आयुक्त न्हावा शेवा, उरण)यांच्या सहकार्याने कंपनीच्या दुय्यम अधिका-यांसोबत दोन बैठका झाल्या. या बैठकी मध्ये आ. बाळाराम पाटिल साहेब, माजी आ. विवेक पाटिल साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत आणि विविध पक्षाचे प्रतिनिधि उपस्थित होते.
हेही वाचा :- भारतीय हॅकर्सचा पाकिस्तानवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राइक’, २०० हून अधिक वेबसाईट्स हॅक
दि 12/2/2019 रोजीच्या बैठकी मध्ये कंपनीचे अधिकारी प्रकाश तुलशीयानी व वसंत शेट्टी यांनी लेखी आश्वासन दिले आहे की सदर कामगारांबाबत दि 20/2/2019 पर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.मात्र अजूनही कोणताही ठोस निर्णय कंपनी प्रशासना कडून देण्यात आलेले नाही. कंपनीचे अधिकारी हे पोलिस अधिकारी व सर्वपक्षीय प्रतिनिधी यांची दिशाभूल करीत आहेत. हे आजपर्यंतच्या कंपनीच्या व्यवहारावरुन दिसून आले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कामगार, स्थानिक कामगार व विविध पक्षाचे प्रतिनिधी यांनी एकमताने ठरविले आहे की जर कंपनीने दि 20/2/2019 रोजी कामगारांबाबत सकारात्मक निर्णय दिला नाही तर गेट समोरच बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना कामगार नेत्या,अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तथा समन्वयक भुमीपुत्र शेतकरी संघर्ष समितीचे श्रुती म्हात्रे यांनी दिला आहे.यावेळी कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्व कामगार वर्गांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे ही कामगार वर्गांची एकमुखी प्रमुख मागणी आहे.ही मागणी या आंदोलनाच्या स्वरूपातुन दिसून आले.मात्र यावेळी कामगार वर्गांच्या मागण्यांकडे सुरवाती पासूनच दुर्लक्ष केल्याने तसेच एकदाही आंदोलन स्थळी भेट न दिल्याने आ. मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र घरत यांचा भुमीपुत्र शेतकरी संघर्ष समितीच्या कामगार वर्गांनी जाहिर निषेध केला.