पोलिसांनी तपासात ढिसाळपणा करू नये ! – हिंदु विधीज्ञ परिषद
लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेल्या प्रकरणांमध्ये तपास जाणीवपूर्वक ढिसाळपणे केला जातो, असा आतापर्यंत अनुभव आहे. या प्रकरणात आरोपी मंत्रीच असल्याने तपास निष्पक्षपणे केला जाईल कि नाही, अशी सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे. यासाठी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी गुन्ह्याच्या अन्वेषणाविषयी अनेक सूचना केल्या आहेत. यामध्ये श्री. करमुसे यांच्या सोसायटी अथवा आजूबाजूच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांतील फुटेज तपासावे, कोणत्या गाड्यांतून त्यांना नेले, त्या गाड्यांनी लॉकडाऊन चालू असतांना कोणाची अनुमती घेतली होती, मंत्रीमहोदयांच्या बंगल्याबाहेरील, तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेर्यांतील फुटेज तपासावे, त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनाची नोंद तपासावी.
हेही वाचा :- शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?; माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंत्री जितेंद्र आव्हाड, त्यासह त्यांच्या बंगल्यातील त्या वेळी उपस्थित पोलीस, नोकर–चाकर, कार्यकर्ते, पोलीस, तसेच तक्रारदार करमुसे आणि त्यांच्या पत्नी या सर्वांचे कॉल रेकॉर्ड अन् मोबाइलची लोकेशन तपासावी, मंत्रीमहोदय ज्या भागात प्रवास करत होते, त्या भागातील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या पावत्या तपासाव्यात, करमुसे यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा, पोलिसांची कोणती गाडी करमुसे यांना घेऊन गेली, काय सांगून घेऊन गेली, त्याच्या स्टेशन डायरीमध्ये काय नोंदी केल्या, या सर्व गोष्टी तपासणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणी सर्व जबाब न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर नोंदवावेत, अशी मागणी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केली आहे.