गुडविन ज्वेलरच्या मालकाने गुंतवणूकदारांची सुमारे 8 कोटींची केली फसवणूक

डोंबिवली दि.२८ :- गुडविन ज्वेलरमध्ये काही कुटुंबियांनी आपल्या आयुष्याची जमपुंजी गुंतवून ठेवली होती. पण आता हा गुडविन ज्वेलर आपल्या दुकानाला टाळे लावुन निघून गेल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला असून गुडविन ज्वेलरचे मालक सुनील व सुधीश कुमार आणि व्यवस्थापक मानूस कुंडी यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुडविन ज्वेलरच्या मालकाने गुंतवणूकदारांची सुमारे 8 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सुनील आहेर यांनी सांगितले.

हेही वाचा :- Live News ; ‘साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री’, विजयी आमदारांची आदित्य ठाकरेंना साद

Leave a Reply

Your email address will not be published.