उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती आणि उपजिल्हा रूग्णालयातील रुग्णशय्यांची संख्या वाढविणार

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

ठाणे दि.१७ :-  उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती रूग्णाल तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णशय्यांची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे.

आरोग्यमंत्री सावंत यांच्या दालनात पार पडलेल्या विशेष बैठकीत या दोन्ही रूग्णालयातील खाटांची क्षमता दुप्पटीने करण्याचा निर्मय घेण्यात आला. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याणसह कर्जत, मुरबाड तालुक्यातील रूग्णांसाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाच्या रुग्णालयांमध्ये दुप्पटीने वाढ होणार ती संख्या लवकरच २०० तर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णशय्यांची क्षमता १०० होणार आहे.

रूग्णालयाच्या आवारात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवासी इमारतींना पाडून त्या ठिकाणी नव्या इमारती बांधण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्री सावंत यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.