पालिका अभियंता सुभाष पाटील यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे गूढ 4 दिवसांतरही कायम

डोंबिवली दि.२६ – कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर डोंबिवलीच्या स्काय वोकवर प्राणघातक हल्ला 22 ता झाला गेल्या चार दिवसांतरही पोलीस आरोपीना अटक करू शकले नाहीत ,हल्लेखोरांचे “टार्गेट “कोणी वेगळे होते का ?अशी चर्चा होत आहे 4 दिवसांतरही पोलीस शोध सुरू आहे अशी टेप वाजवीत असून हल्ल्याचे गूढ कायम आहे. पाटील यांच्यावर हल्ला का झाला या बद्दल अजून कोणी नीट सांगत नाही पाटील यांच्याकडे 5 प्रभागाची कामे मंजुरीसाठी आहेत पण गेल्या 2 आठवड्यात त्याचे कुणाबरोबरही वाद झालेले नाहीत असे कर्मचारी सांगतात

या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी अधिकारी कर्मचारी ‘काळ्या फिती ‘लावून निषेध करणार होते मात्र सध्या बरेच कर्मचारी अधिकारी निवडणुकीच्या कामात अडकल्याने निषेधाचा प्रस्ताव बारगळला पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना कशाचे सोयर सुतक राहिले नाही एकजूट शिल्लक नाही अशी खंत अधिकारी व्यक्त करत आहेत. या हल्ल्यामुळे कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण असून स्काय वोकवर कोणी जाण्यास तयार नाही असेही सांगण्यात आले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी आयुक्त गोविद बोडके व पोलीस उपायुक्त संजय शिंदे याची भेट घेऊन निवेदन दिले असून 22 ता प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करावी अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे ,दरम्यान ,पाटील यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email