रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका ३०० कोटी रुपये खर्च करणार
मुंबई दि.०५ :- रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका यंदा ३०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामांपैकी रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाच्या ३४ कोटींच्या निविदेत फक्त तीन कंत्राटदारांनी बोली लावली असून महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा ती २४ टक्के अधिक आहे.
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले नाही तर राज्यभर आंदोलन – नाना पटोले
विरोधी पक्षाने यास हरकत घेतली असून कंत्राटदारांनी आपापसात संगनमत करून या निविदा भरल्याचा आरोप केला आहे. तर खड्डे बुजविण्यासाठी वापरले जाणारे रिॲक्टिव्ह अस्फाल्ट हे पेटंट केलेले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी अंदाजापेक्षा अधिक बोली लावली असावी, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
अंमलीपदार्थ विरोधी कक्षाच्या कारवाईत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
महापालिकेने यंदा खड्डे बुजविण्यासाठी रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट, हार्डनिंग रॅपिड काँक्रीट तंत्रज्ञानाचा तसेच पारंपारिक मास्टिक या डांबर पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट व हार्डनिंग रॅपिड तंत्रज्ञानासाठी १२५ कोटी, रस्त्यांवरील निकृष्ट दर्जाचे पट्टे, पुर्नपृष्ठीकरणासाठी १२५ कोटी व डांबरासाठी ५० कोटी असे एकूण ३०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत.