२३ शेल कंपन्यांचा समावेश असलेल्या ७८९६ कोटी रुपयांचे बनावट चलन बनवणारे मुख्य रॅकेट उघडकीस आले
नवी दिल्ली दि.०४ :- दिल्ली पश्चिम आयुक्तालयाच्या केंद्रीय कर चुकवेगिरी प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७८९६ कोटी रुपयांचे बनावट चलन बनवणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यांनी २३ शेल कंपन्यांच्या जाळ्याचा वापर करुन प्रत्यक्ष मालाचा पुरवठा न करता बनावट चलनाद्वारे १७०९ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले.
हेही वाचा :- दीड हजारांची लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात
याप्रकरणी दोघांना २९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. या आरोपींनी बनावट चलने तयार करुन इनपुट क्रेडिट मिळवण्यासाठी अनेक नकली कंपन्यांची निर्मिती केली आहे. त्यांच्याकडून अनेक मोबाईल फोन्स, संगणक आणि अवैध कागदपत्रे जप्त करण्यात आली. पटियाला हाऊस न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरु आहे.
Hits: 4