महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मा.राज्यपालांची भेट घेऊन दिले निमंत्रण

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे 5 वे त्रैवार्षिक अधिवेशन 8 व 9 ऑक्टोबर 2022 रोजी स्मृतीभवन, रेशीमबाग, नागपूर येथे होत असल्याचे पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी भारतीय मजदूर संघाच्या ठेका मजदूर महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी मा.वीरेंद्र कुमार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार,आणि भारतीय मजदुर संघाचे कार्यकर्ते निलेश गाडगे या शिष्टमंडळाने पुणे येथील राजभवनामध्ये माननीय राज्यपाल महोदय यांची भेट घेतली.

संघटनेच्या वतीने मा.राज्यपाल महोदय यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या अधिवेशनाची निमंत्रण पत्रिका त्यांना दिली.

 

संघटनेचे वतीने राज्यभरातील आर्थिक दृष्ट्या शोषित पीडित वीज कंत्राटी कामगारांसाठी संघटनेच्या माध्यमातून चालु असलेल्या कार्याची तसेच संघटनेच्या डिजिटल कामकाजाची तसेच या कामगारांना संघटनेने न्याय मिळवून दिलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली तसेच कंत्राटी कामगारांच्या अधिवेशनात कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली आहे.

भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या या ऐतिहासिक अधिवेशना मध्ये सहभागी होण्यासाठी मला हि एक संधी मिळत आहे आणि नागपूरच्या रेशीमबाग येथे हे अधिवेशन असल्याने माझी उत्सुकता वाढली असून मी नागपूर अधिवेशनाला येण्याचा 100% प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मा. राज्यपाल महोदय यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा उल्हास द्विगुणित झाला आहे असे संघटनेचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.