कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई तडीपार सराईत गुन्हेगाराला अटक
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२३ – तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून कल्याण क्राईम ब्राँचने यशस्वी कामगिरी केली आहे. अनंता मारुती म्हात्रे असे या गुन्हेगाराचे नाव असून हा सराईत गुन्हेगार आहे. सदर गुन्हेगारास मानपाडा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरून एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते. तरीसुद्धा हा गुन्हेगार सूचक नाका रवी ऑटो सेंटर कल्याण पूर्व येथे एका मित्राला भेटायला येणार असल्याची कल्याण क्राईम ब्राँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली.
या माहितीवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संतोष शेवाळे पो.उप.निरी.निलेश पाटील, ए.एस.आय साळुंखे, पोलीस-हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद खिलारे, सतीश पगारे, अजित राजपूत, बाळा पाटील आणि अरविंद पवार अधिकारी व कर्मचारी यांनी सदर भागात सापळा रचून त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून मानपाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. अनंत म्हात्रे विरोधात आरोपीवर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये रॉबरी , दरोडा घालण्याची तयारी तर नारपोली पोलीस स्टेशन भिवंडी येथे रॉबरीचा गुन्हा अशा प्रकारे तीन गुन्हे दाखल आहेत.