प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२२ :- सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन आरोग्यसेवा, आदिवासी विकास कार्य कौतुकास्पद- राज्यपाल
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील १३ पुरस्कारांचे वितरण ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता अधिकारी व कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी ही एकाच रथाची दोन चाके आहेत. हे दोन्ही समान वेगाने व समान पद्धतीने एकत्रित चालल्यास महाराष्ट्र हे देशातील सर्वाथाने प्रभावी व लोककल्याणकारी राज्य बनेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मोडी लिपी प्रसार समिती आणि सावरकर स्मारकातर्फे मोडी लिपी स्पर्धा
लोकहिताचे निर्णय शासन घेत असताना त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन करते. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्याने काम केल्यानेच राज्याचा विकास साध्य होऊ शकतो. प्रशासकीय अधिकारी सक्षम असून, त्यांनी ठरविले तर ते राज्याचा कायापालट करू शकतात, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तर सूत्रसंचालन सचिव आर. विमला यांनी केले. ‘यशदा’चे महासंचालक चोकलिंगम यांनी आभार मानले.