संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ डोंबिवलीत पुन्हा अवतरणार!

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.२० :- रघुलीला एंटरप्रायझेस, मधुमालती एंटरप्रायझेस, वेध अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑक्टोबर रोजी ‘संगीत रस सुरस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‌ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा डोंबिवलीत अवतरणार आहे.‌

हेही वाचा :- डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या घरातील दिवेबंद आणि घंटानाद आंदोलन

बालगंधर्व, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.राम मराठे, पं.वसंतराव देशपांडे, दीनानाथ मंगेशकर, जयमाला शिलेदार आणि इतर मान्यवरांच्या गायकीने मराठी संगीत रंगभूमी समृद्ध झाली.‌ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अविट गोडीची नाट्यपदे आणि संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा जीवंत होणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम वेशभूषेसह सादर केला जाणार आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

धनंजय म्हसकर, संपदा माने, केतकी चैतन्य, ओंकार प्रभुघाटे, हृषिकेश अभ्यंकर हे गायक नाट्यपदे सादर करणार असून धनश्री लेले, प्रा. डॉ प्रसाद भिडे सुत्रधाराच्या भूमिकेत आहेत. प्रसाद पाध्ये (तबला), निरंजन लेले (ऑर्गन) आणि अन्य वादक संगीतसाथ करणार आहेत. हा कार्यक्रम येत्या २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे होणार असून तो सशुल्क आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.